By  
on  

चुक अ‍ॅंकरची, हवा सनी लिओनीची पाहा नक्की काय आहे हा प्रकार?

सध्या देशभर निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशा वेळी काही मजेशीर गोष्टीही घडताना दिसून येतात. नावातील गोंधळामुळे चुकलेल्या अ‍ॅंकरवर आज नेटिझन्स चांगलेच घसरले. त्याचं झालं असं अभिनेता सनी देओल गुरुदासपुर येथून निवडणुक लढवत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार सनी यांनी आघाडी घेतली. एका टीव्ही चॅनेलच्या अ‍ॅंकरने हे वृत्त सांगताना सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनीने केला. नेमकी ही बाब बेबीडॉल सनी लिओनीच्या लक्षात आली. तिनेही या व्हिडियोच्या अनुषंगाने पोस्ट करत तिनेही ‘मी किती मतांनी लीड घेतली?’ असं ट्वीट केलं. तिच्या ट्वीटवर नेटिझन्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला.

https://twitter.com/Indian2Raj/status/1131427961410805760

अभिनेते सनी देओल यंदा गुरुदासपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत सनी देओल यांनी आघाडी घेतली होती.

https://twitter.com/SunnyLeone/status/1131430846601162752

Recommended

PeepingMoon Exclusive