By  
on  

आता सोनम कपूर दाखवणार ‘जोया फॅक्टर’चे जलवे, या कलाकारासोबत दिसणार

सोनम कपूरच्या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. बॉलिवूडची ही स्टाईल दिवा आता ‘द जोया फॅक्टर’ सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. हा सिनेमा २० सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. सोनमने सोशल मिडियाच्या माध्यमातून हे पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात सोनमसोबत दुलकर सलमान दिसणार आहे.

https://twitter.com/sonamakapoor/status/1131409519274209281

हा सिनेमा अनु चौहान यांच्या पुस्तकावर आधारित आहे. जोया सिंह सोलंकी नावाच्या मुलीवर हा सिनेमा बेतला आहे. अ‍ॅड एजन्सीमध्ये काम करणारी जोया अपघाताने भारतीय क्रिकेट संघाला भेटते आणि त्यांच्यासाठी लकी चार्म ठरते. याशिवाय भारतीय संघाचा कप्तान निखिल खोडाच्या प्रेमातही पडते. निखिलचा मात्र या अंधविश्वासावर अजिबात विश्वास नसतो.
अभिषेक शर्मा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सोनम सलमान ही जोडी पहिल्यांदाच रसिकांसमोर आली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive