By  
on  

सनी देओलने रोवला यशाचा झेंडा, गुरुदासपुरात ‘ढाई किलो का हाथ’ची किमया

सिनेमात भल्या भल्या व्हिलनना पाणी पाजणारा अभिनेता सनी देओल राजकारणाच्या आखाड्यातही यशस्वी ठरला आहे. सनीने प्रतिस्पर्धी सुनील जाखडचा पदार्पणातच पराभव केला आहे. सनीने मोदींचा हात धरत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या स्टारडमचा फायदा घेत पक्षाने त्याच्याकडे गुरुदासपुरची जागा सोपवली होती. सनीनेही ही जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडत हे जागा जिंकली. प्रचारसभेतही आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी सनी म्हणायचा की, ‘मी इथे भांडण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी नाही तर देशाची सेवा करण्यासाठी आलो आहे’. त्याच्या याच साधेपणाला मतदारांनी पसंती दर्शवली आहे. त्याच्या या विजयानिमित्त धर्मेंद्र आणि इशा देओल यांनी अभिनंदन केलं आहे.

https://twitter.com/aapkadharam/status/1131460442776264705

Recommended

PeepingMoon Exclusive