By  
on  

पुन्हा एकदा रंगणार ‘बंटी और बबली’चं कारस्थान, अमिताभचीही खास भूमिका

अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि अमिताभ यांच्या अभिनयाने सजलेला सिनेमा म्हणजे ‘बंटी और बबली’. या सिनेमाने त्यावेळी सुपरहिट सिनेमाचा मान पटकावला होता. यातील ऐश्वर्याच्या अदांनी सजलेलं ‘कजरा रे’ या गाण्याला त्यावेळी रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. अभिषेक राणीच्या केमिस्ट्रीलाही रसिकांनी पसंती दर्शवली होती. या सिनेमाच्या फॅन्ससाठी एक खुषखबर आहे. या सिनेमाचा सिक्वेल बनणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अभिषेक, राणी आणि अमिताभ लीड रोलमध्ये असणार आहेत. मेकर्स कडून या बातमीला अजून दुजोरा मिळालेला नाही.

खरं पाहता या सिनेमाचा सिक्वेल त्याचवेळी बनवला जाणार होता. पण साजेशी कथा न मिळाल्याने हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नव्हता. राणी मुखर्जी सध्या ‘मर्दानी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अमिताभ ब्रम्हास्त्र मधून रसिकांच्या समोर येईल तर अभिषेक एका कॉमेडी सिनेमात व्यस्त आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive