By  
on  

करीना कपूर या डान्स रिअ‍ॅलिटी शो मधून करणार टिव्ही वर पदार्पण, शुटिंगला सुरुवात

बेगम करीना कपूर खान आता एका नव्या इनिंगला सज्ज झाली आहे. बेबो रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणून स्मॉल स्क्रीनवर दिसणार आहे. करीना ‘डान्स  इंडिया डान्स-बॅटल ऑफ द चैंपियन्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधून परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. करीनाने मंगळवारी या शोच्या शुटिंगला सुरुवात केली आहे.

तिच्यासोबत यावेळी बॉस्को मार्टिस और रॅपर रफ्तारदेखील उपस्थित होते. यावेळी करीनाने एक धमाकेदार एंट्री केली. तिने ‘जब वी मेट पासून ते वीरे दी वेडिंग’ पर्यंतच्या मेडले गाण्यांवर नृत्य केलं. शो दरम्यान तिने लाल रंगाचा आकर्षक जंपसूट घातला होता. यावेळी तिने सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ७ पर्यंत शुटिंग केलं. या शोच्या शुटिंगनंतर करीना ‘अंग्रेजी मीडियम’च्या शुट्साठी लंडनला जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive