By  
on  

मनाचा थरकाप उडवणारा तापसीचा ‘गेम ओव्हर’चा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

तापसी पन्नू हरहुन्नरी अभिनेत्री आहे याबाबत कोणाचंही दुमत नसावं. अभिनेताप्रधान सिनेमातही तापसीने अभिनयाची चमक दाखवली आहे. तापसी आता ‘गेम ओव्हर’ नावाच्या थरारपटात दिसून येणार आहे. काहीसं हटके नाव असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर अंगावर रोमांच उभे करतो यात शंका नाही.

https://www.youtube.com/watch?v=BY-R6NcnkbE

एका अपघातामुळे व्हिलचेअर बसून रहावं लागत असलेल्या तापसीला जबर मानसिक धक्का बसलेला असतो. यातून सावरण्यासाठी ती सतत व्हिडियो गेम खेळत असते. यादरम्यान तिला काही भास पण होत असतात. अशा वेळी तेथील परिसरात काही भयानक घटना घडू लागतात याचा तापसीवर कसा परिणाम होतो हे पाहणं रंजक ठरतं. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगु या दोन भाषांमध्ये बनणार आहे. अश्विन सरवन हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून हिंदीमध्ये अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन असेल. हा सिनेमा १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या टीजरनेही रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive