By  
on  

लेक जान्हवीने यासाठी केलं सोशल मिडियावर बोनी कपूर यांचं अभिनंदन

श्रीदेवी यांच्या निधनानंतर वडिल बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्यातील उत्तम बाँडिंग अनेकदा दिसून आलं आहे. अलीकडेच जान्हवी बोनी यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे. वडिलांचा एक फोटो शेअर करत जान्हवी म्हणते, ‘बाबांनी १२ किलो वजन कमी केलं, स्लिम ट्रिम आणि हेल्थी, सो प्राउड' !!!! ”. या फोटोत बोनी जोधपुरी सुटमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे ते पुर्वीपेक्षा स्लीम आणि फिट दिसत आहेत.

श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी आणि त्यांच्या पाचही मुलांची बाँडिग अत्यंत उत्तम असल्याचं दिसून येत आहे. जान्हवी सध्या गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या फ्लाईट लेफ्ट्नंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. याशिवाय ती करण जोहरच्या तख्त मध्येही दिसणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive