By  
on  

Exclusive: नव्या इनिंगसाठी लारा दत्ता तयार, वेबविश्वात करणार पदार्पण

वेबविश्वाचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सिनेमा किंवा मालिकांइतकेच वेबसिरीजही आवडीने पाहिल्या जात आहेत. अनेक प्रथितयश कलाकारही या माध्यमात आपला कस आजमावत आहेत. या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. माजी ‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ता आता हॉटस्टारच्या वेबसिरीजमधून वेबविश्वात पदार्पण करणार आहे. हा एक स्पेशल शो असणार आहे. ‘100’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. लारा या सिरीजमध्ये लारा  नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो मधील एका अधिका-याच्या भूमिकेत असणार आहे. थोडक्यात या सिरीजमध्ये प्रेक्षकांना भरपुर पोलीसड्रामा पहावयास मिळेल यात शंका नाही. रुचि नारायण या वेबसिरीजचं दिग्दर्शन करत आहे. ही सिरीज ९ भागांची असणार आहे.  आर.ए.टी फिल्म्स ही कंपनी या वेबसिरीजची निर्माती आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive