By  
on  

गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये आमीर खान बनणार सहनिर्माता?

कॅसेटकिंग गुलशन कुमार यांच्या जीवनावर बनत असलेल्या बायोपिकचं नाव ‘मोगुल’ आहे. काही कारणाने हा बायोपिक अनेक दिवस रखडत चालला होता. कास्टमध्ये होत असलेल्या बदलामुळे या सिनेमाचं चित्रिकरण रखडलं होतं. या सिनेमाला आता प्रमुख अभिनेता मिळाला आहे. त्यामुळे आता शुटिंग सुरु होऊ शकेल असं गुलशन कुमार यांचे चिरंजीव भुषण कुमार यांनी सांगितलं. या सिनेमाच्या निर्मितीमध्ये आमीर खानही सहनिर्माता असल्याच समोर आलं आहे. आमीर या सिनेमात भूमिका करणार का? हे विचारलं असता भुषण कुमार म्हणतात, ‘याबद्दल आताच काही सांगू शकत नाही. पण मी खुष आहे की हा सिनेमा बनत आहे आणि अशी व्यक्ती त्यात मुख्य भूमिकेत आहे जी माझ्या वडिलांसारखी दिसते’. हा सिनेमा २०२१ मध्ये रिलीज होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive