By  
on  

हॅँडसम हंक कार्तिक आर्यनला भेटली सुपरक्युट फॅन, पाहा काय केलं तिने

कार्तिक आर्यन अनेक तरुणींचा लाडका अभिनेता आहे. ‘प्यार का पंचनामा’ पासून ते ‘लुका छुपी’ पर्यंतच्या सिनेमांमध्ये त्याने अभिनयाची छाप सोडली आहे. कार्तिकच्या फॅन लिस्टमध्ये केवळ सामान्य तरुणीच नाहीत तर सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचाही समावेश आहे. अलीकडेच कार्तिकची भेट एका छोट्या चाहतीसोबत झाली. या चाहतीने कार्तिक आर्यनला गुलाबाचं फुलही दिलं. कार्तिकने हा क्षण सोशल मिडियावरून चाहत्यांशी शेअर केला आहे. तो म्हणतो, ‘खास क्षण... निरागस प्रेम... हे रोज जपुन ठेवलं आहे.

कार्तिक अलीकडेच कृती सॅनॉन सोबत ‘लुका छुपी’ सिनेमात झळकला होता. या सिनेमाने रसिकांच्या पसंतीची पावतीही मिळवली होती. आता त्याच्याकडे दोन महत्त्वाचे सिनेमे आहेत. तो इम्तियाज अलीच्या ‘आज कल’मध्ये सारा अली खानसोबत दिसणार आहे. याशिवाय तो भूमि पेडणेकर और अनन्या पांडेसोबत 'पति, पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive