By  
on  

अमिताभ-आयुष्मान जोडी ‘गुलाबो-सिताबो’मधून येणार समोर

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ‘गुलाबो-सिताबो’ असं या सिनेमाचं नाव आहे. शुजित सरकार हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. शुजित आणि अमिताभ या सिनेमाच्या निमित्ताने चौथ्यांदा एकत्र काम करत आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी २४ एप्रिलला रिलीज होत आहे. सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी हे ट्वीट केलं आहे. गुलाबो-सिताबोची पटकथा जुही चतुर्वेदी यांनी लिहिली आहे.

जुही यांनी यापुर्वी 'पीकू', 'विकी डोनर' और 'ऑक्टोबर' या सिनेमांची पटकथा लिहिली आहे. रॉनी लेहरी और शील कुमार हे या सिनेमाचे निर्माते आहेत. ‘बिग बींसोबत काम करायला मिळणं म्हणजे एक स्वप्न पुर्ण झाल्यासारखं वाटत आहे,’ असं आयुष्मानने यावेळी बोलताना सांगितलं. या सिनेमात घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील आंबटगोड नात्याचं चित्रण आहे. खडूस घरमालक आणि विनयशील भाडेकरू यांच्यातील केमिस्ट्री या सिनेमात दिसेल. आयुष्मान सध्या ‘आर्टिकल १५’मध्ये दिसून येईल. तर अमिताभ अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’मधून रसिकांच्या भेटीला येत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive