बॉलिवूडच्या सदाबहार सिनेमांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चं स्थान सगळ्यात वरचं आहे. राज-सिमरनची व्यक्तिरेखा लोक आजही विसरले नाहीत. अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखादेखील काही काळासाठी राज-सिमरन बनले आहेत. आजकालचे युवादेखील या सिनेमाचे फॅन आहेत. या सिनेमातील क्लायमॅक्स सिनमध्ये अमरिश पुरी काजोलला म्हणतात, ‘जा सिमरन ! जी ले अपनी जिंदगी’ नेमका हाच सीन राजकुमार राव आणि पत्रलेखा राव यांनी रिक्रिएट केला आहे. या सीनला कॅप्शन देताना राजकुमार राव म्हणतो, ‘आम्ही लंडनमध्ये या गोष्टी करतो
#FunModeOn’
यातील ‘बडी बडी शहरोंमे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा’ असा डायलॉग मारत राजकुमारही शाहरुखची अॅक्टींग करताना दिसत आहे. लंडनच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर या दोघांचा हा फिल्मी रोमान्स चांगलाच बहरताना दिसत आहे. या दोघांच्याही फॅन्सनी या व्हिडियोला भरपूर लाईक्स दिले आहेत.