By  
on  

‘सुपरकूल डॅडी’ सैफला तैमुरच्या या गोष्टीचं वैषम्य वाटतं, का ते जाणून घ्या

सैफ अली खान सध्या सेक्रेड गेम्सच्या दुस-या भागाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय आणखी एका टीव्ही शोमध्येही तो दिसत आहे. या सगळ्यामध्ये व्यस्त असलेला सैफ तैमुरला वेळ देता येत नाही यासाठी नाराज आहे. एका प्रसिद्ध वेबसाईट्ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफने हे वैषम्य बोलून दाखवलं आहे. सैफ म्हणतो, आम्ही बराच काळ शुटिंग करत असतो. अशा वेळी रात्रीचे आठ वाजून चालले की मला वाईट वाटतं. कारण मला माहीत असतं आता मला तैमुरला वेळ देता येणार नाही. कारण मी घरी जाईपर्यंत तो झोपलेला असतो. ते पाहुन मला अनेकदा वाईटही वाटतं. माझ्या आई-वडिलांनी लहानपणापासून कुटुंबाला दिला जाणारा वेळ किती महत्त्वाचा असतो हे मनावर बिंबवलं आहे. त्यामुळे कुटुंबाला दिला जाणारा वेळ खुप महत्त्वाचा असतो हे मी पुरेपुर जाणतो. जर तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकत नसाल तर गे ग्लॅमरचं जग बेकार आहे. सैफ या वर्षाखेरीस सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive