By  
on  

अनुराग कश्यपची ही नवी सुरुवात तुम्हाला माहिती आहे का?

अनुराग कश्यपने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्याने नव्या कंपनीमार्फत नवी सुरुवात केली आहे. यासंबधी नुकतेच त्याने सोशल मिडियावर रसिकांशी शेअर केलं आहे. मागील वर्षी विक्रमादित्य मोटवानी, मधु मंतेना आणि विकास बहल यांच्यासोबत असलेल्या ‘फॅंटम’ कंपनीमधून अनुराग बाहेर पडला होता. फॅंटमने आतापर्यंत मसान', 'लुटेरा' आणि 'उड़ता पंजाब' सारखे सिनेमे दिले आहेत. अनुराग फॅंटममध्ये सात वर्षं होता. पण अनुरागने आता नवी सुरुवात केली आहे.

 

. स्वत:च्या ट्वीटमध्ये अनुराग म्हणतो, ‘नवी कंपनी, नवी फिल्म आणि नवी सुरुवात...’ अनुराग माय एम के नावाच्या प्लॅटफॉर्म सोबत जोडला गेला आहे. ही कंपनी आतंरराष्ट्रीय कलेला भारतीय प्रेक्षकापर्यंत पोहोचवते. अनुरागने अलीकडेच गेम ओव्हर सिनेमा रसिकांसमोर आणला आहे. त्याला रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय तो सांड की आंख सिनेमाची निर्मितीही करत आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive