By  
on  

कबीर सिंहची तुलना मॉडर्न देवदासशी होत असेल तर आनंद : शाहिद कपूर

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत ‘कबीर सिंह’ नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी यानी केलं आहे. व्यसनात बुडालेला आणि थोडा विक्षिप्त असा सर्जन यात शाहिद कपूरने रंगवलेला आहे. हा सिनेमा तेलगूमधील सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. या मूळ सिनेमात साउथ अभिनेता विजय देवराकोंडाने प्रमुख भूमिका साकारली होती. 

प्रेमिकेच्या विरहाने दारू आणि विक्षिप्तपणाचा आहारी गेलेल्या कबीरची तुलना अनेकांनी मॉडर्न काळातील देवदास अशी केली. यावर शाहिद म्हणतो, ‘ कबीर आणि देवदासची तुलना मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेतो. कारण देवदास नावाचा प्रत्येक सिनेमा एक मास्टरपीस आहे. त्यामुळे ही तुलना उतम आहे. देवदासमध्येही प्रेमात सर्वस्व हरवलेल्या व्यक्तीची भूमिका होती. कबीरदेखील काहीसा असाच आहे.’ या सिनेमाती शाहिद आणि कियाराच्या केमिस्ट्रीला लोकांनी पसंती दर्शवली आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive