By  
on  

‘मुंबई सागा’मध्ये पुजा हेगडे आणि श्रिया पिळगावकर यांची वर्णी?

बॉलिवूडमध्ये साठ वर्ष पुर्ण केल्याच्या निमित्ताने संजय गुप्ता पुन्हा एकदा दिग्दर्शनात कस आजमावत आहेत. संजय ‘मुंबई सागा’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणत आहेत. या सिनेमात श्रीया पिळगावकर आणि पुजा हेगडे या अभिनेत्री झळकणार असल्याही चर्चा आहे.

एका प्रसिद्ध वेबपोर्टलने दिलेल्या बातमीनुसार पुजा हेगडे जॉन अब्राहमसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे. तर श्रिया पिळगावकर इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या सिनेमात या चौघांशिवाय जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार आहेत. मुंबई सागा पुढील वर्षी रिलीज होईल. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अनुराधा गुप्ता हे या सिनेमाचे निर्माते आहेत. गॅंगस्टर ड्रामा असलेल्या या सिनेमात बरेच कलाकार एकत्र असल्याने रसिकांची उत्सुकता वाढली आहे. . श्रियाने मिर्झापुर या वेबसिरीजमधून स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. तर पुजा हेगडेने अभिनेता हृतिक रोशनसोबत ‘मोहेंजोदारो’ सिनेमात दिसली होती. आता आगामी ‘मुंबई सागा’ मध्ये या दोघी काय धमाल करतात ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive