By  
on  

बिग बॉस 13: सलमान बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी घेतो गलेलठ्ठ रक्कम

मराठीतील बिग बॉसची चर्चा सुरु असताना हिंदीमधील बिग बॉसचा पडघमही वाजला आहे. या शोचा तेरावा सीझनही सलमान खान होस्ट करणार आहे. मागील सीझनमध्ये सलमान एका शोचे १३ ते १४ कोटी रुपये घेत होता. पण सलमानने आता ही किंमत वाढवली आहे. सलमान आता एका एपिसोडमागे ३१ कोटी रुपये घेणार आहे. म्हणजेच सलमान बिग बॉसच्या या सीझनमधून जवळपास 400 कोटी कमावणार आहे.

यावेळेचा सीझन सेलिब्रिटी स्पेशल असणार आहे. त्यामध्ये चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, विजेंदर सिंह, राहुल खंडेलवाल, हिमांश कोहली, महिमा चौधरी, मेघना मलिक, महाअक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी या नावांची चर्चा सगळ्यात जास्त आहे. या सीझनची उत्सुकता वाढताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुंबईमधील घरात हा पहिलाच सीझन असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive