By  
on  

विकी पुन्हा एकदा दिसणार आर्मी गणवेशात, बनणार सॅम माणेकशॉ

सध्या असलेल्या बायोपिकच्या लाटेमध्ये आणखी एका सिनेमाचा समावेश झाला आहे. भारताचे आठवे लष्कर प्रमुख सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम’ हा बायोपिक येणार आहे. या बायोपिकमध्ये विकी कौशल सॅम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅम यांच्या पुण्यतिथीदिवशीच विकीचा लष्करी युनिफॉर्म लूकमधील फोटो व्हायरल होत आहे. या लूकमध्ये विकी अगदी सॅम यांच्यासारखा दिसतो. ‘राजी’फेम मेघना गुलजार हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

 

१९७१ मधील युद्धात मुत्सदेगिरीचं दर्शन घडवून भारताला विजय मिळवून देण्यामध्ये सॅम माणेकशा यांची महत्त्वाची भूमिका होती. या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना ‘फिल्ड मार्शल’ या किताबाने गौरवण्यात आलं. विकीनेही त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. याफोटो सोबतच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘धाडसी देशभक्ताची भूमिका साकारण्याची संधी मला मिळत आहे याबद्दल मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत आहे. मी खरंच खुप भावूक झालो आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनापासून मी एक नवीन सुरुवात करत आहे.’ विकीचा हा दुसरा बायोपिक असणार आहे. तो एका सिनेमात सरदार उधमसिंग यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive