By  
on  

कार्तिक आर्यनने सारा अलीखानला प्रिंसेस म्हणत शेअर केली ही पोस्ट

करण जोहरच्या शोमध्ये सारा अलीखानने कार्तिक आर्यनचं नाव घेतल्यापासून या जोडीची सगळीकडे चर्चा आहे. विशेष म्हणजे हे जोडी इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात एकत्र झळकणार आहे. हा सिनेमा 10 वर्षांपुर्वी आलेल्या लव्ह आज कल सिनेमाचा सिक्वेल असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं नाव नक्की झालं नाही.

हिमाचलच्या सुंदर वातावरणात सुरु असलेल्या या शुटिंगचं शेड्युल नुकतंच रॅप अप झालं आहे. यावेळी कार्तिकने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत. साराचा उल्लेख मात्र त्याने प्रिंसेस असा केला आहे.

तो म्हणतो, प्रिंसेस सारापेक्षा जास्त चांगली सहकारी मला मिळूच शकली नसती. मला तुझ्यासोबत आणखी सिनेमे करायला नक्कीच आवडेल. कार्तिकच्या या पोस्टनंतर सारा आणि त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याची शंका त्याच्या फॅन्सना आल्याशिवाय राहणार नाही. हा सिनेमा 2020च्या व्हॅलेंटाईन डेला रसिकांसमोर येणार आहे.  

 

Recommended

PeepingMoon Exclusive