By  
on  

शहर की लडकी’ या गाण्यात चालली पुन्हा एकदा सुनील शेट्टी-रवीना टंडनची जादू

सोनाक्षीचा अभिनय आणि हटके कथानक असलेला खानदानी शफाखाना या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. या सिनेमातील गाणं ‘शहर की लडकी देखील नुकतंच रिलीज झालं आहे. हे गाणं बादशाहने गायलं असलं तरी गाण्याला चार चांद लागतात ते सुनील शेट्टी आणि रवीनाच्या फिचरींगमुळे.

 

 

या गाण्यात डायना पेंटी आणि बादशहा यांची केमिस्ट्री असली तरी गाण्यात सुनील आणि रवीनाच भाव खावून जात आहेत. सुनील शेट्टीच्या ‘रक्षक’ सिनेमातील ‘शहर की लडकी’ हे अभिजीतच्या आवाजातील गाणं आजही अनेकांचं आवडतं गाणं आहे. त्यामानाने नवीन गाणं काहीसं फिकं वाटतं. या गाण्याला तनिष्क बागचीने संगीत दिलं आहे. या गाण्यात शहर की लडकी बनलेल्या डायनाचा ग्लॅमरस अंदाज दिसून येत आहे. आदिल शेखची कोरिओग्राफी असलेल्या या गाण्यात सुनील-रवीनाचे ठुमके 90च्या दशकाचा फील नक्कीच देतात. हा सिनेमा 2 ऑगस्ट 2019मध्ये रिलीज होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive