By  
on  

‘अंधाधुन’साठी तब्बू आणि श्रीराम राघवन जाणार मेलबर्नला

2018मध्ये रिलीज झालेल्या दर्जेदार सिनेमांच्या यादीत ‘अंधाधुन’चा क्रमांक सर्वात वरचा आहे. आता परदेशातही या सिनेमाची जादू पसरली आहे. मेलबर्नमध्ये होणा-या इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नसाठी निवड झाली आहे. हे या फेस्टीवलचं दहावं वर्ष आहे. यासाठी तब्बू आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन मेलबर्नला जाणार असल्याचं समोर आलं आहे. भारतात हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2018मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात आयुष्मान खुराणा, तब्बू, राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत. 

तब्बू आणि श्रीराम स्क्रिनिंगला उपस्थित राहतील याशिवाय तेथील प्रेक्षकांशी बातचीतही करतील. या स्क्रिनिंगसाठी श्रीराम खुपच उत्साहित आहेत. ते म्हणतात, ‘अंधाधुन आमच्यासाठी खुपच उत्साहपूर्ण प्रवास होता. आता मेलबर्नमधील स्क्रिनिंग आमच्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. हे फेस्टीवल 8 ते 17 ऑगस्ट पर्यंत चालेल. विशेष म्ह्णजे या फेस्टीव्हलमध्ये शाहरुख खान मुख्य अतिथी असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive