By  
on  

न्युयॉर्कवारीनंतर अर्जुन मलायका भारतात परतले, कॅज्युअल लूकमध्ये झाले स्पॉट

अर्जुन कपूर मलायका अरोरा हे बी टाऊनमधील लाईमलाईटमध्ये असलेलं कपल आहे. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ही जोडी न्युयॉर्क ट्रीपला गेली होती. हे दोघेही या ट्रीपवरून परततानाचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.

या ट्रीपमध्ये अर्जुनने सोशल मिडियावर पहिल्यांदाच आपल्या नात्याची कबुली दिली आहे. या जोडीने अमेरिकेत उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांचीही भेट घेतली होती.

ऋषी आणि नीतूसोबतच्या त्यांच्या फोटोला लाईक्सही खुप मिळाले आहेत. या ट्रीपमध्ये दोघांनीही प्रेमाचा इजहार केला असला तरी त्यांच्या लग्नाबाबत कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे ही जोडी लग्नाच्या बेडीत कधी अडकते याची वाट त्यांचे चाहतेही पहात आहेत.

अर्जुन आगामी ‘पानीपत’ या सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. त्याचा यापुर्वीचा सिनेमा ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नव्हता.

 

Recommended

PeepingMoon Exclusive