By  
on  

हत्यारांनी सज्ज असलेल्या या 'धाकड' गर्लला तुम्ही ओळखलं का?

कंगना राणावत हे नाव दमदार व्यक्तिरेखांशी जोडलं आहेच, त्याशिवाय कॉन्ट्रावर्सीशीदेखील जोडलं आहे. बॉलिवूडमध्ये कंगनाच्या नावावर कितीही कॉन्ट्राव्हर्सी असल्या तरी अभिनयाच्याबाबत तिचं पारडं कायमच जड ठरलं आहे. कंगनाच्या जजमेंटलचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहेत. यात कंगनाचा अभिनय पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत. पण आता तिच्या आणखी एका सिनेमाचं पोस्टर येऊ घातलं आहे.

 

‘धाकड’ असं नाव असलेल्या सिनेमात कंगना झळकणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. यामध्ये कंगनाच्या हातात बंदुका दिसत आहेत. कंगना उभी असलेला परिसर आग आणि धुराने वेढला आहे. याठिकाणी युद्धसदृश्य परिस्थिती दिसत आहे. यावरूनच कंगनाचा आगामी सिनेमा अ‍ॅक्शनपॅक्ड असल्याचं समजत आहे.

2020च्या दिवाळीचा मुहुर्त साधत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. रजनीश रेजी घई या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive