By  
on  

कंगनाचा रुद्रावतार, पत्रकारांना सुनावले खडे बोल

कंगना राणौत आणि वाद हे समीकरण आता नित्याचंच होऊन बसलं आहे. कंगना जाते तिथं फटकळ स्वभावामुळे काहीतरी वाद निर्माण करून ठेवतेच. ‘जजमेंटल है क्या?’ च्या प्रमोशन दरम्यान असाच किस्सा घडला. कंगना सध्या ‘जजमेंटल..’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ‘मणिकर्णिका’च्या मुद्द्यावरून एका पत्रकाराने कंगनाला छेडलं असता ती चांगलीच भडकली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

‘कंगना म्हणते मी हा सिनेमा बनवून जणू चूक केल्यासारखंच वाटत आहे. मी असा सिनेमा बनवला म्हणून तुम्हाला मी फाजील देशाभिमान असलेली मुलगी वाटत आहे का? यावर त्या पत्रकाराने कंगनाचं हे मत फेटाळून लावलं तसेच त्याने ‘मणिकर्णिका’विषयी चांगलं न लिहिल्याचा तिचा दावाही फेटाळून लावला. कंगना आणि संबंधित पत्रकाराच्या वादाविवादामुळे तिथे उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले होते.

या प्रेस मीटमध्ये तिच्यासोबत असलेल्या राजकुमार रावलाही अवघडल्यासारखं वाटत होतं. ‘जजमेंटल है क्या?’ मध्ये राजकुमार आणि कंगना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 26 जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive