By  
on  

अर्जुन कपूरची ही पोस्ट वाचून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी !

अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची खास मैत्री बी-टाऊनमध्ये प्रत्येकाला माहीत आहे. पण रणवीरच्या वाढदिवसादिवशी मात्र अर्जुन व्यस्त होता. पण उशीरा का होईना त्याने आपल्या दोस्ताला खास अंदाजात विश केलं आहे. रणवीरचा 6 जुलैला वाढदिवस असतो. यादिवशी फॅन्स आणि सहकलाकाराकडून रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

अर्जुननेही रणवीरसाठी पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने रणवीरला बी लेटेड हॅपी बर्थडे विश करत ‘इंडस्ट्रीचा खरा चॉकलेट बॉय’ही म्हटलं आहे. अर्जुन सध्या ‘पानीपत’ सिनेमात काम करत आहे. त्याच्यासोबत या सिनेमात कृती सॅनॉन आहे. तर रणवीर सध्या ‘83’मध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive