By  
on  

ट्रोलरला तापसीने दिलं इतकं मजेदार उत्तर की तुम्हालाही हसू येईल

दमदार अभिनेत्रींमध्ये तापसी पन्नूचं नाव सगळ्यात वर येतं. अनेक सिनेमांमध्ये तिने आपल्या दर्जेदार अभिनयची छाप सोडली आहे. बेबी, पिंक, बदला, मनमर्जियां, गेम ओव्हर, मुल्क यांसारख्या सिनेमात तापसीने अभिनयाची छाप सोडली आहे. मुल्कचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा दिग्दर्शित करत असलेल्या एका नव्या सिनेमात तापसी काम करणार आहे.

 

‘थप्पड’ असं तापसीच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. तापसीने नुकतीच ही माहिती सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यावर एका ट्रोलरने अनुभव यांना म्हटलं की, ‘अनुभव सिन्हा तुम्ही या सिनेमासाठी दुस-या कुणाला तर साईन करा. कारण तापसीला अ‍ॅक्टींग येत नाही.’

 

 

आता या ट्रोलवर गप्प बसेल ती तापसी कसली! तिनेही त्याला खरमरीत उत्तर दिलं, ती म्हणते, ‘सॉरी यार, आता तर सगळंच साईन झालं आहे. आता तर मी सरांना सिनेमातून अजिबात काढू देणार नाही. आता तुम्ही त्यांना लवकरच पुढच्या सिनेमासाठी पटवा, नाहीतर त्यावेळीही हा सिनेमा मीच साईन करेन.’ तापसीच्या या रिप्लायचं सगळीकडं कौतुक होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive