By  
on  

महिला वैज्ञानिकांचं कार्य समोर आणणारा ‘मिशन मंगल’

मल्टीस्टारर ‘मिशन मंगल’ टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या टीजरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भारताच्या मंगलयान प्रक्षेपणाच्या घडामोडीवर हा सिनेमा बेतला आहे. या टीजरमध्ये सुरुवातीला अक्षय दिसतो पण त्यानंतर दिसते ती सगळ्या आघाड्यांवर सक्षमपणे लढणारी महिला वैज्ञानिकांची तुकडी. अक्षयने अलीकडेच या सिनेमातील महिला वैज्ञानिकांबद्दल मत व्यक्त केलं.

तो म्हणतो, ‘महिला वैज्ञानिकांच्या कथा आपण अनेकदा वाचतो. पण अनेकदा अशा तणावपूर्ण आणि मोठी जबाबदारी असलेल्या वातावरणात काम करूनही त्या सगळी जबाबदारी उत्तम निभावतात हे खरंच खुप कौतुकास्पद आहे.’ या सिनेमाबाबत अधिक बोलताना अक्षय म्हणतो, नासाने मंगळावर 6000 कोटीं रुपये खर्च करून एक उपग्रह पाठवला होता. पण इस्रोने हे मिशन केवळ 450 कोटींमध्ये पूर्ण केलं आहे. थोडसं सामान्यज्ञान वापरून आपण देशाचे बरेच पैसे वाचवले आहेत. ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्यात मजा आहे.’ या सिनेमात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि शरमन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मिशन मंगल 15 ऑगस्टला देशभर प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive