By  
on  

Exclusive: अमेझॉन प्राईमवर अनुष्का शर्मा घेऊन येत 'जमुना पार'

अनुष्का शर्मा उत्तम अभिनेत्री तर आहेच पण चांगली निर्माती पण आहे. आतापर्यंत तिने  'एनएच 10', 'फिल्लौरी' आणि 'परी'सारख्या हटके सिनेमांची निर्मिती केली आहे. आता अनुष्का वेबविश्वात पदार्पण करत आहे. ती अ‍ॅमेझॉनसाठी एका वेबसिरीजची निर्मिती करणार असल्याचं पीपिंगमूनच्या सुत्रांना समजलं आहे. अनुष्काचा नवा शो दिल्लीतील एका तपासकार्यावर बेतला आहे.

‘जमुना पार’ असं या नव्या वेबसिरीजचं नाव आहे. प्रोसित रॉय आणि अविनाश अरुण हे या वेबसिरीजचे दिग्दर्शक असणार आहेत. तरुण तेजपाल यांच्या द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स' या पुस्तकावर हा शो आधारलेला आहे. क्राईम बेस्ड पॉलिटिकल ड्रामा असं थोडक्यात या वेबसिरीजचं वर्णन करता येईल. ही सिरीज दहा एपिसोडची असणार आहे. या वर्षाखेरीस किंवा 2020च्या सुरुवातीला ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive