हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ सिनेमाने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

By  
on  

गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारलेला सिनेमा ‘सुपर 30’ रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनाची चांगली पकड घेतली होती. आता सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या सिनेमात हृतिक रोशन  मुख्य भूमिकेत आहे.

 

हृतिकसाठी हा सिनेमा खास आहे कारण एका कालावधीनंतर हृतिक मोठ्या पडद्यावर दिसत आहे.
12 जुलैला रिलीज झालेल्या सिनेमाने आतापर्यंत 12 कोटींची कमाई केली आहे. हृतिक आणि मृणाल ठाकूर यांची केमिस्ट्रीही रसिकांना आवडत आहे. हृतिकचे सुपर 30 म्हणजे असे विद्यार्थी असतात जे समाजातील वंचित वर्गातून आलेले असतात. अशा मुलांच्या आत्मविश्वास जागवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शिक्षक आनंदकुमार यांनी केलं आहे.

Recommended

Loading...
Share