सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांच्यासोबत वर्ल्ड्कपच्या फायनल मॅचला अक्षय कुमारची हजेरी

By  
on  

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार लंडनला जाणार असल्याचं वृत्त आम्ही तुम्हाला दिलं होतं. अक्षय लंडनमध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांनाही हजर राहणार होता.

त्याप्रमाणे अक्षय नुकताच फायनल मॅचच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून आला. त्याच्यासोबत यावेळी सौरव गांगुली आणि हरभजन सिंगदेखील होते.

यावेळी चालेल्या हास्यविनोदात अक्षयनेही सहभाग नोंदवला. अक्षय काही दिवसांपूर्वीच सुट्टीसाठी लंडनला आला आहे.

अक्षयचा मुलगा आरव इथे शिकत आहे. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी तो वरचेवर इथे येत असतो. आज होणा-या फायनल मॅचलाही त्याने हजेरी लावली आहे.

Recommended

Loading...
Share