शाहिद कपूरने पत्नी मीराला या अंदाजात दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा

By  
on  

बॉलीवूडमधील स्टायलिश कपलमध्ये शाहिद कपूर-मीरा यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. या जोडीचे अनेक फॅन्स आहेत. सोशल मिडियावरही शाहिद मीराच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसतो.

अ‍ॅरेंज मॅरेज असूनही या दोघांमधील बॉण्ड चाहत्यांना ‘couple goals’ देत असतो. या जोडीच्या लग्नाला 7 जुलैला चार वर्षं पूर्ण झाली. एका आठवड्यानंतर मीराने अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You make my world and me go round ️ #happy4

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

 

मीराने लग्नाच्या वेळचा एक खास फोटो देखील यावेळी शेअर केला आहे. ज्यात ती आणि शाहिद एका क्युट पोजमध्ये दिसत आहेत.

दिल्लीची रहिवासी असलेल्या मीराशी शाहिद 7 जुलै 2015 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकला होता. शाहिद सध्या आयुष्यातील मेगा हिटचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

त्याच्या तेलुगु रिमेक असलेल्या ‘कबीर सिंह’ची कमाईने आतापर्यंत 240 कोटींचा आकडा कधीच पार केला आहे. अजूनही देशातील बहुतांश थिएटरमध्ये कबीर सिंह टॉप रेटेड सिनेमांपैकी एक आहे.

Recommended

Loading...
Share