बॉलिवूडमधील आताच्या स्पर्धेत कष्टाशिवाय पर्याय नाही : अनिल कपूर

By  
on  

 वयाची पन्नाशी उलटली तरी आजही लूक्समध्ये अनेक तरुण अभिनेत्यांना मागे टाकणारा कलाकार म्हणजे अनिल कपूर. अनिल कपूर यांच्या स्टाईलचे आजही अनेक चाहते आहेत. पत्रकार राजीव मसांद यांनी अलीकडेच अनिल कपूर यांची मुलाखत घेतली. यात अनिल यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. अनिल म्हणतात, ‘लोक मला कलेपाठीमागे वेडा असलेला म्हणायचे. मी प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी अवाजबी मेहनत करतो असंही मला अनेकजण सांगायचे. पण मला नेहमी वाटायचं कष्टांची खिल्ली उडवण्याऐवजी आपण कायम कौतुक करावं.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I think Ahmedabad looks pretty good on me, but I could be biased!

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on

 

यापुढे ते म्हणतात, आता हे सगळं नॉर्मल झालं आहे. आता एखादा अभिनेता जास्त मेहनत घेत असेल तर तो वर्षाकाठी एकच सिनेमा करेल. पण आधीच्या काळात वर्षात एक सिनेमा करणं म्हणजे तुमच्याकडे कोणतंही काम नाही असाच समज व्हायचा. पण आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. अनिल कपूर आगामी  'पागलपंती' सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा 8 नोव्हेंबर 2019 ला रिलीज होईल.

Recommended

Loading...
Share