By  
on  

Exclusive: अभय देओल बनणार आर्मी ऑफिसर, दिसणार हॉटस्टारच्या वेबसिरीजमध्ये

सध्या वेबसिरीजनी मनोरंजनची संकल्पना बदलली आहे. चाकोरीबाहेरचे विषय वेबसिरीजच्या माध्यमातून हाताळले जातात. लीडिंग डिजीटल प्लॅटफॉर्म असलेलं हॉटस्टार आता प्रेक्षकांसाठी वॉरड्रामा घेऊन आलं आहे. हॉटस्टारच्या या नव्या वेबसिरीजमध्ये अभय देओल आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

ही सिरीज भारत चीन युद्धावर आधारित आहे. यामध्ये सैनिकांचं जीवन दाखवलं जाणार आहे. अभय देओल यात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसेल. या सिरीजच्या शुटिंगला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर डिसेंबरच्या मध्यावर हा शो रसिकांच्या भेटीला येईल. या सिरीजमधील इतर कलाकारांची नावं फायनल झाली नाहीत. याशिवाय सिरीजचं टायटलही अजून ठरायचं आहे. अभय देओलने यापूर्वीही मिथिला पारकर हिच्यसोबत ‘चॉपस्टिक्स’ नावाच्या वेबसिरीजमध्ये झळकला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive