By  
on  

Exclusive: बॉलिवूड कमबॅकसाठी सुपरफिट शिल्पा शेट्टी आहे रेडी

शिल्पा शेट्टी कुंद्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये जलवा दाखवायला तयार झाली आहे. शिल्पा रमेश तौरानीच्या सिनेमातून कमबॅक करणार आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार शिल्पाने दोन सिनेमे साईन केले आहेत. त्यापैकी रमेश तौरानींचा सिनेमा विनोदी जॉनरचा आहे. यात दिलजीत दोसांज आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.

शिल्पाची या सिनेमात लेखकाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय शिल्पा अजीज मिर्जा यांचा मुलगा हारुण मिर्जा याचा दिग्दर्शन डेब्यु असलेल्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं नाव अजूनही ठरलेलं नाही. शिल्पा सध्या पती राज कुंद्रा आणि विवान सोबत लंडन आणि ग्रीसमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे. ती ट्रीपवरून आल्यानंतर लगेचच शुटिंगला सुरुवात केली आहे. शिल्पा 2007 मध्ये ‘अपने’ सिनेमात शेवटचं दिसली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive