'पाहा Teaser : सत्तेसाठी काय पण' संजय दत्तच्या 'प्रस्थानम'मध्ये रंगलय सत्तेचं सूडनाट्य

By  
on  

60 व्या वाढदिवसादिवशी ‘प्रस्थानम’चा टीजर रिलीज करण्याचा संजय दत्तचा मनसुबा अखेर पूर्ण झाला आहे. मान्यता दत्तची निर्मिती असलेला ‘प्रस्थानम’चा टीजर अखेर रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये सत्तेसाठी चालेल्या कुरघोड्या दिसत आहेत. मल्टीस्टारर ‘प्रस्थानम’चा टीजर पाहताना प्रभाव पाडतो. हा सिनेमा एका तेलुगु सिनेमाचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे.

 

‘हक दोगे तो रामायण शुरु होगी, छीन लोगे तो महाभारत’ संजय दत्तच्या आवाजातील या दमदार डायलॉगने या टीजरची सुरुवात होते. यात मारामारी, राग, खुन्नस, सूड, प्रेम या सगळ्याचं एकत्रित मिश्रण आहे. राजकिय घराणी आणि त्यांच्यातील वर्चस्ववादासाठी होणारे संघर्ष हा मसाला बॉलिवूडसाठी नवीन नसला तरी ‘प्रस्थानम’ काहीसं वेगळं आपसूक जाणवतं. या जोडीला मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांच्या दमदार परफॉर्मन्सची जोडही लाभली आहे. निर्माती म्हणून मान्यताचा हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमात संजय दत्त, मनीषा कोइराला, जैकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन देवा कट्टा यांचं आहे.

Recommended

Loading...
Share