By  
on  

कार्तिक आर्यन म्हणतोय, सारा अली खानसोबत आणखी सिनेमे करायचे आहेत

सध्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी प्रेक्षकांचीही आवडती बनली आहे. सारा आणि कार्तिकदेखील बिनधास्त एकमेकांच्या सहवासत वेळ घालवताना दिसत आहेत. ही जोडी आता एका सिनेमातूनही समोर येताना दिसत आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना कार्तिकने साराविषयीचं मत शेअर केलं आहे.

कार्तिक म्हणतो, ‘सारा ख-या अर्थाने स्टार आहे. ती एका माणूस म्हणूनही उत्तम आहे. मला तिच्यासोबत काम करताना मजा आली. मला तिच्यासोबत सतत काम करायला आवडेल.’ कार्तिक म्हणतो, ‘सारासोबत असताना मला खुप सकारात्मक वाटतं’ तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव कायमच उत्तम असतो. सारा आणि कार्तिक आता इम्तियाज अलीच्या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचं शुटिंग अलीकडेच रॅप अप झालं आहे. यावेळी सारा आणि कार्तिकचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. कार्तिक आता ‘पती पत्नी और वो’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं लखनऊ येथे शुटिंग सुरु आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive