By  
on  

सोनम कपूरने पती आनंदला या रोमॅंटिक अंदाजात दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजाचा आज वाढदिवस आहे. यावेळी सोनम कपूरने रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी सोनमने एक फोटो शेअर करताना लिहिलं ‘Happy happy birthday to the love of my life. मी आतपर्यंत भेटलेल्या लोकांपैकी तुम्ही सगळ्यात कुलीन, सभ्य आणि आदर्श आहात. माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्तम व्यक्ती आहात. तुम्ही स्वत:ची स्वप्न नक्कीच पूर्ण कराल अशी मला आशा आहे. तुम्ही इतरांपेक्षा खुप चांगले आहात.

 

सोनमच्या पोस्टला रिप्लाय करताना आनंद म्हणतो, ‘माझ्याकडे हे फोटो का नाहीत?’ तु खरंच बेस्ट आहेस. तुझ्यासोबत प्रत्येक दिवस वाढदिवसासारखा आहे. लव्ह यु सो मच’. सोनमचा आगामी सिनेमा ‘झोया फॅक्टर’ आहे. यात ती दलकीर सलमानसोबत झळकणार आहे. अभिषेक वर्मा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. यापूर्वी सोनम ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive