By  
on  

‘ये सिंदूर दूर तक जायेगा’ म्हणत अक्षय कुमारने नव्या प्रोमोतून दाखवली ‘Woman Empowerment’

सध्या अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ची चर्चा सगळीकडे आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट ला रसिकांच्या भेटीला येत आहे. भारताच्या महत्त्वकांक्षी मंगळ मिशनचा प्रवास या सिनेमातून मांडला गेला आहे. या सिनेमाच्या दमदार ट्रेलरनंतर आणखी एक भावनिक प्रोमो रिलीज झाला आहे. या नव्या प्रोमोत महिला सशक्तीकरण या मुद्द्याला उचलून धरलं आहे.

या प्रोमोमध्ये अक्षयच्या आवाजातील एक कविता आहे. ‘ये कंगन शोर मचाएगा, एक सपना रात जगाएगा, जितना ऊंचा हो आसमान, ये सिंदूर दूर तक जाएगा...’ असे बोल असलेल्या गीताचे शब्द प्रभावी आहेत. ‘ये सिंदूर’ असं या नव्या प्रोमोचं नाव आहे. या मिशनमध्ये महिला वैज्ञानिकांचं योगदान अत्यंत मोलाचं होतं. त्यामुळे या प्रोमोला ‘फॅमिनाईन टच’ देण्याचा प्रयत्न मिशन मंगलच्या दिग्दर्शकांनी केला आहे.


 

अक्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन, शर्मन जोशी, परेश रावल, किर्ती कुल्हारी हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. जगन शक्ती या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. भारताच्या मिशन मंगळ मोहिमेच्या यशानंतर हा सिनेमा कसा असेल याची उत्सुकता रसिकांमध्ये आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive