By  
on  

पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार रामायणाची जादू, ह्र्तिक आणि दीपिका असतील राम-सीतेच्या भूमिकेत

भारतीय प्रेक्षकांना धार्मिक मालिकांची, सिनेमांची भुरळ कायमच पडली आहे. आता रामायण भारतीय प्रेक्षकांसमोर सिनेमाच्या स्वरुपात येत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि रवि उद्यावर यांनी रामायणवरील सिनेमाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा 3डी स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बिग बजेट सिनेमात कोण कोणत्या भूमिका साकारणार हे समोर आलं नसलं तरी मुख्य भूमिकेसाठी कलाकारांची निवड झाली आहे. या सिनेमात हृतिक रोशन रामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका पदुकोण सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हृतिकला या सिनेमासाठी विचारलं असता त्यानेही होकार कळवला असल्याचं समोर आलं आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणचं नाव समोर आलं आहे. मधु मंतेना या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमाचं बजेट जवळपास 500 कोटींचं असणार आहे. हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलुगुमध्येही बनवला जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive