By  
on  

एका गैरसमजामुळे अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ला करावा लागला मनसे नेत्यांकडून धमकीचा सामना

सुपरस्टार अक्षय कुमारने या स्वातंत्र्यदिना दिवशी ‘मिशन मंगल’चा प्रोमो अनेक भाषांमध्ये डब करण्याचं प्रयोजन केलं. यावेळी अक्षयचा हा मराठी प्रोमो अभिनेता रितेश देशमुखने लाँच केला आहे. पण हा प्रोमो लाँच करताना अ‍क्षयला कल्पनाही नसेल की मनसेच्या काही नेत्यांना हे आवडणार नाही. 

या प्रोमोमध्ये अक्षयने महिला वैज्ञानिकांच्या कार्याचा गौरव करणारी कविता सादर केली आहे. हिंदीमध्ये ‘ये सिंदूर’ असं या नव्या प्रोमोचं नाव आहे. अक्षयने मराठीशिवाय, गुजराती, बंगाली, तेलुगु, पंजाबी या भाषांमध्ये रुपांतरित होणार आहे. पण मराठीतील प्रोमोवर मनसे चित्रपट सेना नेते अमेय खोपकर यांनी विरोध दर्शवला. अमेय म्हणतात, ‘मूळ ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटास किंवा तो प्रदर्शित होण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण तो मराठीत प्रदर्शित करण्यास आक्षेप आहे.’

पण अक्षय केवळ प्रोमो मराठीतून रिलीज करत असून सिनेमा मराठीत डब करण्याचा त्याचा कोणताही इरादा नाही हे समोर आलं आहे. 'मिशन मंगल' ISRO मध्ये काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांची कहाणी आहे, ज्यांनी २०१४ च्या मंगळ मोहिमेसाठी विशेष योगदान दिले होते. .जगन शक्ती दिग्दर्शित 'मिशन मंगल' १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive