‘क्या ये दुनिया बचाने लायक है?’ सेक्रेड गेम्स 2’ च्या नव्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठीचा रसिकांना प्रश्न

By  
on  

नेटफ्लिक्सची बहुचर्चित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स 2’ चा आज एक नवी टीजर रसिकांच्या भेटीला आला आहे. हा टीजर गुरुजी पंकज त्रिपाठी यांच्यावर आधारित आहे. या व्हिडियोमध्ये जास्त दृश्य सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागातील आहेत. व्हिडियोच्या बॅकग्राउंडला गुरुजींच्या रुपात पंकज दृश्याची पार्श्वभूमी सांगत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Father to Gaitonde. Teacher to all. Pranaam Guruji

A post shared by Netflix India (@netflix_in) on

 

या व्हिडियोच्या शेवटी ‘ इस दुनिया को बचाना होगा, पर क्या ये दुनिया बचने के लायक है? अब जो काम भगवान नहीं कर पाए, इंसान करेगा. अहम् ब्रम्हास्मि, अहम् ब्रम्हास्मि'. 
लेखक विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनला रसिकांची चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी यांची भूमिका रसिकांसाठी सरप्राईजिंग असणार आहे. हा सीझन 15 ऑगस्ट 2019 ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share