अनुष्का शर्माच्या स्वीमसुटमधील फोटोला पती विराटने दिली ही कमेंट

By  
on  

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कायम लाईम लाईटमध्ये असणारं कपल आहे. ही जोडी नेटिझन्सचीही हॉट फेव्हरिट आहे. अनुष्का सध्या विराटसोबत वेस्ट इंडिजच्या दौ-यावर आहे. विराट आणि त्याची टीम दक्षिण अफ्रिकेत क्रिकेट सिरीज खेळत आहे. यावेळी अनेकदा मॅचच्या दरम्यान अनुष्का टीमला चीअर करताना दिसली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sun kissed & blessed ️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

मॅचसोबतच अनुष्का कॅरिबियाई बीचेसचाही आनंद घेत आहे. तिने अलीकडेच सोशल मिडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोवर नेटिझन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनुष्का या फोटोला कॅप्शन देताना म्हणते, ‘सन किस्ड अ‍ॅण्ड ब्लेस्ड’. या फोटोत तिने ऑरेंज कलरचा स्वीम सुट घातला आहे.

या फोटोमध्ये ती खुपच आनंदित दिसत आहे. विशेष अनुष्काच्या या फोटोवर विराटनेही कमेंट केली आहे. विराटने एक हार्ट इमोजी शेअर केली आहे. अनुष्का सध्या विराटसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आले. काही दिवसांपुर्वी ती शाहरुख, कतरिना सोबत ‘झीरो’ सिनेमात दिसली होती.

Recommended

Loading...
Share