हिंदी मालिकेत पहिल्यांदाच दिसणार उपेंद्र लिमयेच्या अभिनयाचा करिष्मा

By  
on  

हरहुन्नरी अभिनेता उपेंद्र लिमये याने अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आता तो हिंदी मालिकेतून रसिकांच्या समोर येणार आहे. उपेंद्र ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो कथ्थक शिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहे. बाप आणि मुलीच्या नात्याचा हटके पैलू या मालिकेत दिसणार आहे.

 

या भूमिकेसाठी उपेंद्रने खास मेहनत घेतली आहे. त्याने कथ्थकचं बेसिक प्रशिक्षणही घेतलं आहे. उपेंद्र यापुर्वी मराठी मालिका नकुशीमध्ये झळकला होता. पण हिंदी भाषेतील ही पहिलीच मालिका आहे. उपेंद्र लवकरच एका मराठी सिनेमातही दिसणार आहे. याशिवाय तो अनुराग कश्यपसोबतही एका सिनेमात झळकेल. तारा फ्रॉम सातारा ही मालिका सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे.

Recommended

Loading...
Share