By  
on  

नाजूक आलियाच्या दमदार वर्कआऊट्चा हा व्हिडियो पाहिलात का?

आलिया भट तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते, तितकीच तिच्या फिटनेससाठीही. आलियाच्या सुपरफिट पर्सनॅलिटीमुळेच आजही ती टीनएजर वाटते. आलिया तिच्या जवळच्या लोकांमध्ये ‘फिटनेस फ्रिक’ म्हणूनही ओळखली जाते. या फिटनेस फ्रिक बबली गर्लचा एक व्हिडियो नुकताच समोर आला आहे. यात ती 50 किलोचे डेड्लिफ्ट करताना दिसत आहे.

 

 

या लिफ्टींगचे तिने जवळपास 10 सेट पुर्ण करताना या व्हिडियोत ती दिसत आहे. आलियाने अलीकडेच महेश भट यांच्या ‘सडक 2’ उटीमधील शेड्युल संपवलं आहे. याशिवाय ती अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’मधूनही रसिकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ती संजयलीला भन्साळींच्या ‘इन्शाअल्लाह’ या सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. तसेच ती करण जोहरच्या ‘तख्त’ सिनेमामधूनही रसिकांच्या समोर येणार आहे. यापुर्वी ती ‘कलंक’मधून रसिकांच्या समोर आली होती. यातील तिच्या अदाकारीने रसिकांचं मन मोहून घेतलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive