अभिनेता प्रभासचे फॅन्स जगभरात पसरले आहेत. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी फॅन्स आतुर असतात. नुकताच प्रभासचा साहो सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या प्रेमापोटी प्रभासच्या फॅनने साहो थाली तयार केली आहे. हॉटेल व्यावसायिक असलेल्या या फॅनने भली मोठी थाली तयार करून तिला ‘साहो थाली’ असं नाव दिलं आहे.
या भल्या मोठ्या थाळीत व्हेज कोल्हापुरी, भेंडी, दहीवडा, राजस्थानी डाळ, बाजरीची रोटी, केशरी पुलाव आणि श्रीखंड यासोबत जवळपास 30 पदार्थ आहेत. या हॉटेलचे संचालक आशीष माहेश्वरी या थाळीबद्दल बोलताना म्हणतात, ही थाळी सगळ्यात मोठी थाळी आहे. यात पाच ते सहा लोक एकत्र जेवू शकतात. प्रभासला याबद्दल समजल्यावर तो म्हणतो, ‘साहोसाठी एक आख्खा मेनू बनवणं खुपच प्रभावित करणारं आहे. माझ्यावर इतकं प्रेम करणा-या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. जबरदस्त अॅक्शनचा भरणा असलेला साहोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.