By  
on  

बदललं अक्षय कुमार- करीना कपूरच्या ‘गुड न्युज’ सिनेमाचं नाव

अभिनेता अक्षय कुमारने नुकताच त्याचा 52 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या दिवसाचं औचित्य साधून अक्षयने ‘पृथ्वीराज’ या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर बेतलेला सिनेमा दिवाळीवेळी रिलीज होत आहे. पण आता अक्षयच्या सिनेमाच्या संदर्भात आणखी एक घोषणा समोर आली आहे.

 

अक्षय, करीना कपूर खान, दिलजीत दोसांज, किआरा आडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा ‘गुड न्युज’चं नाव बदलल्याचं समोर आलं आहे. यापुर्वी सिनेमाचं नाव good news होतं पण आता या सिनेमाचं नाव ‘Good Newws’ असं असणार आहे. हा सिनेमा 27 डिसेंबर 2019ला रिलीज होत आहे. या बदलाबाबत निर्माता करण जोहरने ट्वीट केलं आहे. ट्वीट मध्ये तो म्हणतो, ‘ वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्षय कुमार.... गुड न्युज ही आहे की आपला सिनेमा ‘Good Newws’ या वर्षाचा शेवट धमाकेदार करेल. 27 डिसेंबर 2019ला या सिनेमात तुम्हाला सगळ्यांना पाहायला उत्सुक आहे. अक्षय सध्या ‘सुर्यवंशी’, ‘लक्ष्मी बाँब’, ‘बच्चन पांडे’ या सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive