By  
on  

तापसी साकारणार ‘अमृता प्रीतम’, ‘थप्पड’ सिनेमातील पहिला लूक समोर

‘गेम ओव्हर’, ‘मिशन मंगल’च्या यशानंतर तापसी पुन्हा एकदा अभिनयाचा जलवा दाखवण्यास सिद्ध झाली आहे. तापसी आता प्रसिद्ध साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनव सिन्हा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. तापसीने नुकताच या सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तापसी सलवार कमीज लांब केस या पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.

 

तिच्या हातात स्क्रिप्ट सारखं काहीतरी आहे. काही दिवसांपुर्वीच अनुभवने या सिनेमाची रिलीज डेट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, ’11 शुभ अंक आहे. हा माझा 11 वा सिनेमा आहे. तसेच माझ्यासाठी आतापर्यंतचा सगळ्यात अवघड सिनेमा आहे. आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. हा सिनेमा देशातील महिलांना समर्पित आहे. या सिनेमा सहित 6 मार्च 2020ला भेटू.’ या ट्वीटला रिप्लाय करताना तापसी म्हणते, ‘ या वर्षी ‘वुमन्स डे’ ला आणखी उत्तम बनवूया. पुरुषांसोबत सगळ्या महिलांशी माझी भेट 6 मार्च, 2020 ला होईल.' या सिनेमाशिवाय तापसी ‘सांड की आंख’ या सिनेमातूनही रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive