आज सुरु झालं आयुष्मान खुराणाच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चं शुटिंग

By  
on  

आयुष्मानचा एक सिनेमा रिलीज होतो न होतो तोच तो दुस-या सिनेमाच्या तयारीत गुंतलेला असतो. आता त्याच्या ‘ड्रीमगर्ल’ सिनेमाची चर्चाही सर्वत्र सुरु आहे. याच दरम्यान त्याच्या पुढील सिनेमाचा मुहुर्त समोर आला आहे. आयुष्मानच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आहे. हा सिनेमा आतापर्यंतच्या सिनेमापेक्षा वेगळा असणार आहे.

यात देखील पुर्वीच्या सिनेमाप्रमाणे एक लव्हस्टोरी असेल पण यात स्टोरीतही एक ट्वीस्ट असणार आहे. ही लव्हस्टोरी एका गे कपलची असणार आहे. हा सिनेमा भुषण कुमार आणि आनंद राय यांची प्रस्तुती आहे. हितेश केवल्य हे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या पुर्वीचा भाग प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला होता. पण ते दुस-या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ही संधी हितेशकडे चालून आली.

Recommended

Loading...
Share