बॉक्स ऑफिसवर ‘ड्रीमगर्ल’ची जादू, इतकं आहे आतापर्यंतचं कलेक्शन

By  
on  

आयुष्मान खुराणावर यश चांगलंच प्रसन्न झालेलं दिसत आहे. हात लावेल त्या सिनेमाला यश मिळताना दिसत आहे. आयुष्मान यात ड्रीमगर्ल म्हणजेच पुजाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची चांगलीच भुरळ पडलेली दिसत आहे. या सिनेमाचं शुक्रवारचं कलेक्शन 10.05 कोटी आणि शनिवारी 16.42 कोटींची उत्तम कमाई केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत 26.47 कोटींची कमाई केली आहे.

 

आयुष्मान या सिनेमाला मिळालेल्या ओपनिंग बाबत म्हणतो, ‘मला आनंद आहे की ड्रीमगर्ल सिनेमाचं ओपनिंग अत्यंत उत्तम आहे. या सिनेमाला प्रत्येक गटातून अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. या सिनेमा माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. या सिनेमाने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं आहे.’ आयुष्मान या सिनेमानंतर ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहे.

Recommended

Loading...
Share