By  
on  

भूत पार्ट 1 - 'द हॉन्टेड शिप' आणि ‘बाला’ची रिलीज डेट बदलली, आता या दिवशी होणार रिलीज

विकी कौशल आणि आयुष्मान खुराणा असे अभिनेते आहेत ज्यांच्या सिनेमाची वाट प्रत्येकजण पहात असतो. पण यावेळी मात्र या दोघांच्या फॅन्सनाही थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण या दोघांच्याही सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. भूत पार्ट 1 - 'द हॉन्टेड शिप'  हा विकी कौशल आणि भूमी पेडणेकर अभिनीत सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होणार होता. पण आता तो 21 फेब्रुवारी 2020 ला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन भानूप्रताप करत आहेत. या बदलाबाबत ट्वीटमध्ये करण जोहर म्हणतो, ‘ लाट बदलली आहे. विचारांना सुद्धा शुद्धतेची गरज आहे. तुम्हाला पुरेसं आणि योग्यप्रकारे घाबरवण्यासाठी जास्तीच्या वेळेची गरज आहे. ‘भुत’ जवळ एका नवीन तारीख आहे 21 फेब्रुवारी 2020....’

 

यशिवाय करणने ट्वीट करून आयुष्मान खुराणा अभिनीत ‘बाला’ या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबरला रिलीज होणार होता, पण तो आता 15 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमात आयुष्मान सोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतम आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive